ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे पर्यटनाच्या विकासासाठी राजकीय भेदाभेद टाळण्याचे  आवाहन ; आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव २०२३ चे झाले उद्घाटन.

शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे पर्यटनाच्या विकासासाठी राजकीय भेदाभेद टाळण्याचे आवाहन ; आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव २०२३ चे झाले उद्घाटन.

प्रकाशन: 12 Aug 2023 07:18 PM
वाचन संख्या 185

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत पर्यटन वाढीसाठी आयोजीत केलेल्या ‘आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवाचे’ उद्घाटन झाले आहे. शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. १२ ते १६ ऑगस्ट पर्यंत हा उत्सव चालणार आहे. या वर्षा पर्यटन महोत्सवाला हजारो पर्यटक अपेक्षित आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आंबोली बाजारवाडी ते मुख्य धबधब्यापर्यत पर्यटकांना जाण्या- येण्यासाठी तसेच जंगल सफारीसाठी इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याच्या सूचना यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ह्या पर्यटन महोत्सवाची ख्याती जगभरात पसरविली जाईल अशी घोषणाही त्यांनी या पर्यटन महोत्सवात केली. एकत्रीत पर्यटन विकास साधायचा असेल तर राजकीय भेदाभेद टाळण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते पुढे म्हणाले सर्वत्र हॉटेल बांधून पर्यटन विकास होत नसतो. आंबोलीला जैवविविधतची नैसर्गिकतेची देणगी आहे . आंबोलीत ४ महिने पाऊस पडतो तर चेरापुंजीत नऊ महिने पाऊस पडतो. देशात एअर फ्लो म्हणजे पावसाचे पाणी परत येणे अशी मोजकीच ठिकाणे आहेत. त्यामुळे कावळेसाद पाॅईंट येथे हँग ग्लायडींग होणे शक्य आहे. हा प्रकल्प येथे होणे असल्याचे ते म्हणाले. तसेच ऍडव्हेन्चर स्पोर्स्टसाठी कावळेसाद पॉंईट महत्वाचा आहे. तसेच या ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी आंबोली ,चौकुळ , गेळे, ही गावे एकत्रित होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील पंचक्रोशीचा विकास होऊ शकेल. इथे एक ठोस ‘होस्ट प्लॅन’ आवश्यक असल्याचेही आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

आंबोली हा पर्यटनाचा ब्रॅन्ड तयार व्हावा म्हणून आता दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यंदा ९ राज्यांतील ५० टूर ऑपरेटर्स या महोत्सवाला अपेक्षित आहेत असे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या महोत्सवा दरम्यान आंबोली घाटातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या वर्षा पर्यटन महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स