ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
काही समस्या उद्भवली तर भाऊ म्हणून हाक मारा ; आमदार नितेश राणे यांचे 'हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन.

काही समस्या उद्भवली तर भाऊ म्हणून हाक मारा ; आमदार नितेश राणे यांचे 'हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन.

प्रकाशन: 10 Aug 2023 08:09 PM
वाचन संख्या 226

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे ‘हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची संकल्पना आहे. ही संकल्पना राज्यात यशस्वी झाली. तशीच कणकवली मध्ये सुद्धा यशस्वी होईल. जनतेला या दवाखान्याचा पुरेपूर फायदा होईल असे काम करा. पावसाळा सुरु झाल्याने साथीचे आजार फैलावत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सावध राहून काम करावे असे प्रतिपादन यांनी यावेळी केले. ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ व्या वित्त आयोग अंतर्गत हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ जि. प. शाळा क्र. ४ च्या इमारतीमध्ये सुरु करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कांबळे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी सभापती प्रकाश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, जि. प. चे माजी सदस्य रवींद्र जठार, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, पं. सं.चे कक्ष अधीक्षक सी. डी. परब, सामान्य विभागाच्या अधिकारी मनीषा देसाई, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, डॉ. सतीश गोसावी, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना असून ती राज्यातील प्रत्येक तालुक्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. आपल्या तालुक्यात आपला दवाखाना सुरु झाला असून या दवाखान्याच्या माध्यमातून याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन तो समाधानाने परत जाईल, याची काळजी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोणालाही काही समस्या आल्यास हक्काने हाक मारा असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सई धुरी म्हणाल्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तम संकल्पना आहे. यांतर्गत सिंधुदुर्गसाठी ७ आपले दवाखाने मंजूर झाले आहेत. वेंगुर्ले, देवगड तालुक्यात आपला दवाखाना सुरु झाला असून आजपासून कणकवली आपला दवाखाना सुरु होत असून याचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. दवाखानाच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात लोप्टोस्पायरेसीस व इतर रोगांचा फैलाव होत असतो. मात्र, यंदा त्याचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामस्तरावर उपाययोजना केल्या आहेत. साथीच्या आजार व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सतर्क असून ते रोखण्यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत. याशिवाय ‘मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत’ लहान मुलांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. सई धुरी यांनी सांगितले. यावेळी आपला दखावान्याचे इनचार्ज डॉ. सतीश गोसावी यांचा आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात सुरवातीला पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत डॉ. सई धुरी व पूजा काळगे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल जमदाडे यांनी केले. आभार पूजा काळगे यांनी मानले. या कार्यक्रमाला पं. स. च्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स