प्रेमनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.) 'वरळीचा राजा' ची नवीन कार्यकारणी जाहीर.
अध्यक्षपदी श्री. प्रविण बबन शेवाळे तर अभिजित केसरकरांकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी.
संतोष साळसकर | सहसंपादक : मुंबई येथील सुप्रसिद्ध वरळी – प्रेमनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी ७ ऑगस्टला शिवसेना शाखा क्र- १९६ येते वरील मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक भोले यांच्या अध्यक्षतेखाली सभा बैठक घेण्यात आली. यावेळी नवीन कार्यकरणीची निवड करण्यात आली. या मध्ये सर्व माजी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सभेमध्ये चर्चा करण्यात आलेले विषय खालीलप्रमाणे.
सन २०२२ चे जमाखर्च अहवाल सादर केले. श्री गणेश उत्सव २०२३ साजरा करणे संदर्भात चर्चा. तसेच साल २०२३ व २०२४ साठी खालीलप्रमाणे नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली.
प्रविण बबन शेवाळे – अध्यक्ष
अभिजित केसरकर – उपाध्यक्ष, विजय वासुदेव मेढेकर – सेक्रेटरी, मंगेश वाघमोडे पाटील – उपसेक्रेटरी- संतोष आमते खजिनदार, सुनिल मुरूडकर – उपखजिदार गोविंद सावंत, रियाज मुल्ला, संदीप शिरसाठ – हिशोब तपासनीस यांची निवड करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)