ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांच्या स्वनिधीतून आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळेला संगणक संच व प्रिंटर प्रदान ; समुदाय आरोग्य अधिकार्यांनी मानले आभार.

आमदार नितेश राणे यांच्या स्वनिधीतून आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळेला संगणक संच व प्रिंटर प्रदान ; समुदाय आरोग्य अधिकार्यांनी मानले आभार.

प्रकाशन: 08 Aug 2023 03:31 PM
वाचन संख्या 213

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या कुवळे येथील ‘आरोग्यवर्धिनी केंद्र, कुवळे’ या केंद्रातील कर्मचारी यांना आरोग्य विभागाच्या खास ऑनलाईन कामकाजासाठी कुवळेतून शिरगांवला जावे लागत असे. आमदार नितेश राणे यांनी या गोष्टीची दखल घेतली. ग्रामपंचायत कुवळे रेंबवलीचे सरपंच सुभाष कदम, उपसरपंच प्रदोष प्रभूदेसाई, ग्रा.पं सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, सुहास राणे, सौ प्रणया मालणकर, सौ उर्मिला परब, सौ.रोहिणी लाड, सौ.सानिका म्हणयारे आणि बूथ प्रमुख श्री.अजित घाडी यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्यवर्धीनी केंद्र, कुवळेला संगणक संच व प्रिंटर सरपंच सुभाष कदम यांच्या हस्ते आणि कुवळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या स्वनिधीतू हे संगणक संच व प्रिंटर प्रदान झाले आहेत.

यावेळी सरपंच सुभाष कदम यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले. आम्ही आमदार नितेश राणे मार्गदर्शनाखाली गांवचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत असेही वक्तव्य केले. आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळे साठी संगणक संच आणि प्रिंटर देऊन आमची समस्या दूर केली त्यामुळे ग्रामपंचायत कुवळेचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आभारी आहोत आणि आमदार साहेबांचे आम्ही विशेष आभारी आहोत असे आरोग्यवर्धिनी केंद्रच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पूजा साळुंखे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, बूथप्रमुख, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सौ.पावसकर सिस्टर सौ. तावडे सिस्टर, आशा स्वयंसेविका रश्मी चिंदरकर, गटप्रवर्तक सौ. फाटक, मदतनीस, सौ भावना कदम, ग्रापमपंचे संगणक ऑपरेटर विरेश वळंजू ,भाजपा युवा प्रमुख कुवळे विनोद कुवळेकर, लक्ष्मण बागवे, निलेश घाडी, अनंत घाडी, सखाराम घाडी, रवी घाडी, उल्हास परब, कदम आणि महिला भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स