ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आपापल्या क्षेत्रात पारदर्शक कामगिरी करणे हीच शहीद हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना खरी श्रद्धांजली : भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य नवलराज काळे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आपापल्या क्षेत्रात पारदर्शक कामगिरी करणे हीच शहीद हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना खरी श्रद्धांजली : भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य नवलराज काळे.

प्रकाशन: 08 Aug 2023 04:08 PM
वाचन संख्या 209

सरपंच,उपसरपंच,सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केले वंदन.

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ‘हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे’ यांना सीमेवरती लढताना वीरमरण येऊन काल ७ ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीला वंदन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलत असताना भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी मेजर कौस्तुभ रावराणे यांचे बलिदान आपण व्यर्थ जाऊ देऊ नये. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो मग ते क्षेत्र राजकीय, सामाजिक, व्यावसायिक कुठलाही असो, त्या क्षेत्रातील कामात आपली पारदर्शकता असावी व सत्य मार्गाने योग्य काम आपण केली पाहिजेत. जे सीमेवरती लढताहेत ते आपल्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता दुष्मनांशी लढा देत आहेत. त्यांच्यामुळेच आपण देशामध्ये सुखी आहोत निवांत आहोत. त्यामुळे आपण पारदर्शकतेपणाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारचे कार्य केले तर ती खरी शहीद मेजर कौस्तुभ दादा यांना श्रद्धांजली असेल. त्यामुळे सर्वांनी योग्य मार्गाने काम करावे व आपल्या जबाबदाऱ्या समजून गांवातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे असे प्रतिपादन काळे यांनी केले.

यावेळी प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक विनोद कर्पे यांनी ही आपल्या भाषणात जे सीमेवर ती लढत आहेत त्यांच्या कुटुंबाची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाचा आपण सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन केले.

यावेळी गांवचे सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच अनंत जंगम, मेजर कौस्तुभ रावराणे यांचे कुटुंब सदस्य अनिल रावराणे, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, ग्रामसेवक प्रशांत जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री कर्पे, श्री कांबळे, श्री कुवर, श्री भैरळे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी श्री महेंद्रकर, आरोग्य सेवक बोडेकर, आरोग्य सेविका चाफे, सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स