ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कवयित्री अंजली मुतालिक यांना कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार प्रदान.

कवयित्री अंजली मुतालिक यांना कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 06 Aug 2023 06:41 PM
वाचन संख्या 204

सिंधुवैभव साहित्य समुह या संस्थेच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील
सिंधुवैभव साहित्य समुह या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार कुडाळ येथील सुप्रसिद्ध कवयित्री सौ. अंजली मुतालिक यांना नुकताच प्रदान करण्यात आला. जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांच्या हस्ते सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यावेळी मंचावर डॉ. अमुल पावसकर, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सतिश पवार, समाज समुपदेशक डॉ.रुपेश पाटकर, सुप्रसिद्ध कवियत्री सरिता पवार , शुभांगी पवार, अर्ज संस्थेचे अरुण पांडे आणि पुरस्कार प्राप्त कवयित्री अंजली मुतालिक यांचे आई वडिल व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारा बद्दल, गेली काही वर्षे सातत्याने साहित्य सेवा करणार्या कवयित्री अंजली मुतालिक यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य वर्तुळातून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स