ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
'सैनिक हो तुमच्यासाठी' अंतर्गत माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान ; मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या माध्यमातून संपन्न झालेला विशेष उपक्रम.

'सैनिक हो तुमच्यासाठी' अंतर्गत माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान ; मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या माध्यमातून संपन्न झालेला विशेष उपक्रम.

प्रकाशन: 06 Aug 2023 04:35 PM
वाचन संख्या 345

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे येथे महसूल सप्ताह अंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या संकल्पने अंतर्गत मंडळ अधिकारी कार्यालय मसुरे येथे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या समस्या व अडीअडचणी बाबत विचारणा करण्यात आली.

यावेळी माजी सैनिक श्री.धनंजय रमेशचंद्र सावंत (सेवानिवृत्त तलाठी), श्री.दिपक अनंत बागवे(रास्तधान्य दुकानदार देऊळवाडा) यांचा श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत माजी सैनिक कै.बाबुराव राणे यांच्या पत्नी श्रीम.उषाबाई बाबुराव राणे व कै. नारायण गावडे यांच्या पत्नी श्रीम. शानन नारायण गावडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या व अडीअडचणींबाबत विचारणा करण्यात आली व त्यांचाही शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध अर्थसाह्य योजना सलोखा योजना याबाबत माहिती देण्यात आली. मयत खातेदार यांचे वारस तपास करून घेण्याबाबत मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांनी माहिती दिली.

या वेळी मंडळातील तलाठी आर. एस. शेजवळ, तलाठी एस. पी. लखमोड, कोतवाल सचिन चव्हाण, संतोष चव्हाण, विकास पोयरेकर, डाटा ऑपरेटर श्रीकांत खोत, प्रतिक्षा परब, महसूल कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स