ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निलीमा चव्हाण हिचा निघृण खून करणार्‍या नराधमाला तत्काळ शिक्षा करा ; कणकवली नाभिक संघटनेकडून पोलीस निरिक्षकांना निवेदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

निलीमा चव्हाण हिचा निघृण खून करणार्‍या नराधमाला तत्काळ शिक्षा करा ; कणकवली नाभिक संघटनेकडून पोलीस निरिक्षकांना निवेदन.

प्रकाशन: 06 Aug 2023 02:14 PM
वाचन संख्या 579

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कणकवली नाभिक’ संघटनेने नुकत्याच घडलेल्या चिपळूण ओमळी येथील दुर्दैवी घटनेतील नाभिक समाजाची युवती निलीमा सुधाकर चव्हाण हिचा अमानुष पणे खून करणार्‍या नराधमाला तत्काळ शोधुन त्याला कठोर शिक्षा करावी यासाठी आणि घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिंदोळकर यांना निवेदन दिले.

कामावरुन गावी येत असताना अचानक बेपत्ता झालेल्या निलीमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ येथील खाडीत सापडला. तपास यंत्रणेने लवकरात लवकर तपास करुन दोषींना कठोर शासन करावे व अन्यायग्रस्त चव्हाण कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा यासाठी कणकवली पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक सचिन हिंदोळकर यांनी पुढील चौकशी करण्यासाठी तातडीने नाभिक महिलांचे निवेदन पुढे पाठवत असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा सौ. तेजस्विनी कुबल, उपाध्यक्ष निलेश चव्हाण, युवा तालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार गणेश चव्हाण, जेष्ठ नाभिक कार्यकर्ते दिगंबर चव्हाण, सुभाष चव्हाण, अनंत चव्हाण, महिला सचिव आरती चव्हाण, कार्याध्यक्ष संजय कुबल, शहराध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हा खजिनदार शिवानी चव्हाण, अस्मिता अणावकर, ज्योती टिपुगडे, चंदा चव्हाण, मैथिली चव्हाण, संजय चव्हाण, शरद लाड , चव्हाण आणि ४० पेक्षा अधिक नाभिक बंधु-भगिनी उपस्थित होते. सर्वांनी अत्याचारित निलीमा सुधाकर चव्हाण हिला या दरम्यान श्रद्धांजली वाहिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स