ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वेंगुर्लेत प्रा. अमेय महाजन यांनी केले, स्पर्धा परीक्षा, तलाठी भरती व करीअर उभारणी बाबत केले विशेष मार्गदर्शन.

वेंगुर्लेत प्रा. अमेय महाजन यांनी केले, स्पर्धा परीक्षा, तलाठी भरती व करीअर उभारणी बाबत केले विशेष मार्गदर्शन.

प्रकाशन: 06 Aug 2023 03:14 PM
वाचन संख्या 252

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे प्रशासकीय अधिकारी घडवण्याबाबत विशेष मार्गदर्शन उपक्रम संपन्न झाला. आज काळ बदलला आहे. हे संगणकिय व इंटरनेट शिक्षणाचे युग आहे. नोकऱ्यांसाठी त्या त्या शिक्षणाच्या संकल्पनेनुसार तसे शिक्षण हि काळाजी गरज बनली आहे. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही. तसेच आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीनुसार दुरदृष्टीने शिक्षण घेतल्यास उद्योग व्यवसायांतून सुध्दा आपण मोठे बनू शकतो असे प्रतिपादन मुंबई येथील किर्ती महाविद्यालयाचे प्रा .अमेय महाजन यांनी केले.

मल्टी स्किल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग सेंटर, सिधुदुर्ग या संस्थेतर्फे आज येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात घेतलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटनप्रसंगी सारस्वत बँकचे वरिष्ठ तज्ज्ञ संचालक सुनिल सौदागर, किर्ती महाविद्यालय, मुंबईचे समाजकार्य अभ्यासक्रमाचे प्रथितयश प्राध्यापक व समन्वयक अमेय महाजन, मार्गदर्शक डॉ. अमेय देसाई, बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, भाजपाचे कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, शिबिराचे आयोजक प्रसन्ना देसाई, सारस्वत बँक वेंगुर्ला शाखाधिकारी सतिष वाळवे, मल्टी स्किल रिसर्च ॲन्ड ट्रेनिग सेंटर सिधुदुर्गचे सचिव विजय रेडकर आदी उपस्थित हते.

दहावी, बारावी झाल्यानंतर विद्यार्थी इंजिनिअर किवा डॉक्टर होण्यासाठी त्या दिशेने जातो. परंतु, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे. याचे कारण म्हणजे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी आहे. त्यासाठी स्पर्धा परिक्षांची कास धरा आणि त्यात यश मिळवा असे आवाहन प्राचार्य डॉ.बांदेकर यांनी केले. तर विजय रेडकर यांनी प्रास्ताविकात मल्टी स्किल रिसर्च ॲन्ड ट्रेनिग सेंटर सिधुदुर्ग या संस्थेचे कार्य विशद केले.

या कार्यक्रमाला बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय, रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेज व वेतोरे येथील गुलाबताई नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर अमेय महाजन यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स