स्त्रीरोग तज्ञ डॉ. दुर्भाटकर यांच्या हस्ते उद्या 'वन रुपी क्लिनिक'चा शुभारंभ ; कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मिळणार १ रुपयांत आरोग्य सेवा.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे सेवाभावी डॉक्टर व स्त्री रोग तज्ञ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या संकल्पनेतून आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या पुढाकारातून उद्या सावंतवाडी येथे ‘वन रुपी क्लिनिक’चा शुभारंभ होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त म्हणजे फक्त एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील अनेक डॉक्टर या क्लिनिक मध्ये सामाजिक भावनेतून काम करणार आहेत.
या अंतर्गत कान, नाक, घसा, त्वचारोग, डायबिटीस, स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ असे वेगवेगळे डॉक्टर असणार तरी जास्तीत जास्त गरजू लोकांनी याचा फायदा घ्यावा अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)