ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओसरगांव क्र.१ शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन उपक्रम ; मान्यवरांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व केले विशद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओसरगांव क्र.१ शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन उपक्रम ; मान्यवरांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व केले विशद.

प्रकाशन: 05 Aug 2023 04:01 PM
वाचन संख्या 141

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगांव क्र.१ येथे ‘पावसाळी रानभाज्या प्रदर्शन’ उपक्रम तथा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सरपंच सुप्रिया कदम, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवबा अपराज, मुख्याध्यापक किशोर कदम, शीतल दळवी मॅडम,जगन्नाथ राणे केंद्र प्रमुख विजय मसुरकर , बाळकृष्ण आलव ,प्रतिक्षा चौकेकर, प्रिया जाधव, साळवी ,परब, एमडीएम समन्वयक सावंत मॅडम उपस्थित होते. शाळेतील मुलांनी भाज्यांची माहिती दिली. सर्व उपस्थित मान्यवरांनी मुलांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले. शिक्षण विस्तार अधिकारी मांजरेकर मॅडम म्हणाल्या की पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या परिसरात पहायला मिळतात. शरीराला अत्यंत आवश्यक असणा-या या भाज्याचां आपल्या आहारात पालकांनी वापर करावा व आरोग्य चांगले ठेवावे.

मुख्याध्यापक किशोर कदम यांनी परसात,शेतरानात,माळावर उगवणाऱ्या या रानभाज्यांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना व्हावी तसेच त्यातील पोषक जीवनसत्वे,खनिजे,उपयुक्तता याचं ज्ञान आजच्या पिढीला व्हावे.हा या प्रदर्शनाचा हेतू विषद केला . दूर्वा अपराज (सुरण , ) मनस्वी अपराध (चवईचेबोंड ), धृव जाधव (टाकळा ), तन्मय राणे (कुरुडू), जागृती येंडे (शेवग्याचा पाला), चैतन्या आलव (फोडशी ), भूमी कदम (अळू ), तन्वी मोहिते (अळू), इशिका तांबे (शेवग्याचा पाला ), मानवी वंडर (शेवग्याचा पाला ), वैष्णवी आलव (अळू ), गार्गी चव्हाण (ओव्याची पाने), लावण्या परब( भारंगी), अथर्व आलव (भारंगी ), गंधार चौकेकर (पेवगा), चैत्राली चौकेकर (भारंगी), प्रांजली राणे (शेवग्याचा पाला ), तुषार डुकरे (अळू ), लजांवती सालवी (अळू ), राशी मोहिते (कुरुडू ), चव्हाण (कुरुडू) यांनी भाज्यांचा मांडणी केली.
या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांचा सहभाग छान लाभला. दुपार सत्रात पोषण आहारात मुलांनी रानभाजीचा आस्वाद घेतला.यावेळी पालक उपस्थित होते. मान्यवरांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर कदम तर सूत्रसंचलन श्रीम . प्रमीता तांबे यांनी केले तसेच आभार राजश्री तांबे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स