ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अभिनेत्री नमीता गांवकर यांचा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला ; दिग्गज कलाकारांसोबत नुकतेच संपन्न झाले चित्रिकरण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अभिनेत्री नमीता गांवकर यांचा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला ; दिग्गज कलाकारांसोबत नुकतेच संपन्न झाले चित्रिकरण.

प्रकाशन: 27 Jul 2023 07:40 AM
वाचन संख्या 684

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील अभिनेत्री नमीता गांवकर यांच्या एका आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच संपन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपन्न झालेल्या या चित्रिकरणाबाबत नमीता गांवकर अतिशय सकारात्मक असून कला क्षेत्रात जिल्ह्यातील कलावंतांचा सन्मान वाढतच राहीला पाहिजे अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नमीता गांवकर यांच्या ह्या आगामी सिनेमात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, भार्गवी चिरमुले यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत दिग्गज कलाकार झळकणार आहेत. ह्या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतिसाद लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्या सिनेमाचे चित्रीकरण झाल्यामुळे या सिनेमाबद्दल त्यांना अतिशय सकारात्मक उत्साह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सन मराठी या वाहिनीवरुन नमीता गांवकर सध्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेतून जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाची त्यांच्या सर्व चाहत्यांना उत्कंठा लागलेली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स