ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर महाविद्यालय बारावी मध्ये एकता सावंतमोर्ये प्रथम

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर महाविद्यालय बारावी मध्ये एकता सावंतमोर्ये प्रथम

प्रकाशन: 04 Aug 2021 04:39 PM
वाचन संख्या 84

बांदा | राकेश परब : दी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा चा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.महाविद्यालयातून ३४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यात विज्ञान शाखेतील कु.एकता महादेवं सावंतमोर्ये हिने ९८.५० टक्के गुण घेत प्रथम क्रमाक तर अकाऊंट ऑफिस मॅनेजमेंट मधील कु. रत्नप्रभा एकनाथ केळूसकर हिने ९२.३३ टक्के घेत दृतीय व विज्ञान शाखेतील कु.देवांशु योगेश परुळेकर याने ९१.६७ टक्के घेत महाविद्यालयात तृतीय क्रमाक पटकाविला.यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था , पालक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला.बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय मधून ३४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेतून कु.एकता महादेव सावंतमोर्ये ९८.५० टक्के प्रथम, देवांशु योगेश परुळेकर ९१.६७ दृतीय, सुरेश रघुनाथराम चोधरी ९०.१७ तृतीय., कला-प्रज्ञा शांताराम असणकर ८१.१७ प्रथम, प्राची संजय शिरवलकर ८१.०० दृतीय, साक्षी संतोष सावंत ७७.८३ तृतीय, वाणिज्य-युगंधरा आनंद मेस्त्री८८.५० प्रथम, दीक्षिता दिलीप नाईक८३.१७ दृतीय, तेजल दीपक देसाई८१.३३ तुतीय, हॉर्टीकल्चर- कौशल्य बाबाजी आळवे ६७.०० प्रथम, वासुदेव सावळाराम कुडव ६३.१७ दृतीय, यशवंत उदय परब ५७.१७ तृतीय, अकाऊंट व ऑफिस मॅनेजमेंट- रत्नप्रभा एकनाथ केळुसकर ९२.३३ प्रथम, रमीता राजेंद्र धुरी ८१.५०दृतीय, कविता सुभाष परब ८०.८३, इलेक्ट्रिकल टेक्नॉंलॉजी- उत्तम राजाराम आळवे ६७.६७ प्रथम, सर्वेश सदानंद गावडे ६७.१७ दृतीय, विठ्ठल संतोष पिंगुळकर ६६.१७ तृतीय यांनी क्रमांक पटकाविले
उत्तीर्ण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, अध्यक्षा सीमाताई तोरसकर, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर व प्रशालचे मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स