ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्ह्यातील कलाकारांसाठी भरीव प्रयत्न करणार ; सिने-टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती नंतर सौ. संजना हळदिवे यांचे प्रतिपादन. ( सिनेपट विशेष )
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्ह्यातील कलाकारांसाठी भरीव प्रयत्न करणार ; सिने-टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती नंतर सौ. संजना हळदिवे यांचे प्रतिपादन. ( सिनेपट विशेष )

प्रकाशन: 13 Jul 2023 06:27 PM
वाचन संख्या 312

सौ. संजना हळदिवे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून होत आहे प्रशंसा..!

सिनेपट | मालवण प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. संजना संजय हळदीवे यांची सिने- टेली कलाकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सिने- टेली कलाकार
सेवा संघाचे पूर्व मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनिल गोडबोले, किशोर पाटील, अनामिका सावंत, सचिव डॉ. वैष्णवी बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.

सिने टेली कलाकार संघ देशातील ६ राज्यांत कलाकारांसाठी कार्यरत आहे. सौ. संजना हळदिवे यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

सिने-टेली ही संस्था राज्यातील मराठी चित्रपट सृष्टी व नाट्यसृष्टी यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम तसेच लेखन, दिग्दर्शन, अभिनय अभ्यासक्रम चालविण्यासाठी सरकार प्रमाणेच आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ प्रमाणित असतील, अशाच कोर्सेससाठी तसेच मराठी निर्मात्यांना माफक दरात मोबदला घेवून चित्रिकरणाला जागा उपलब्ध करून देण्याचा आणि सभासदांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार वगैरेंना संघटनेच्या माध्यमातून काम, व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी भरीव प्रयत्न व काम करणार असल्याचे आश्वासक प्रतिपादन नूतन अध्यक्ष सौ. संजना हळदिवे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स