ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाला आ. भास्कर जाधवांची प्रमुख उपस्थिती ; जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये उत्कंठावर्धक चैतन्य.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाला आ. भास्कर जाधवांची प्रमुख उपस्थिती ; जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये उत्कंठावर्धक चैतन्य.

प्रकाशन: 13 Jul 2023 03:31 PM
वाचन संख्या 175

आमदार भास्कर जाधव यांचे सकाळी विजय भवनात होणार स्वागत ; आमदार वैभव नाईक यांचीही असणार विशेष उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे सुपुत्र तसेच कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शुक्रवारी १४ जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे घणाघाती नेते आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कणकवलीत त्यांच्या शब्दांची धडाडती तोफ अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व युवा सैनिक तसेच युवती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठावर्धक चैतन्य आहे. आमदार भास्कर जाधव यांचे सकाळी १०:३० वाजता कणकवली विजय भवन येथे स्वागत केले जाणार आहे. सकाळी ११ वाजता कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे संदेश पारकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ०१:३० ते ०२:०० वा. पर्यंत कणकवली विजय भवन येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. तर संध्याकाळी ०४ वाजता विजय भवन येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत.

युवा नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स