२४ व्या 'मुंबई डिस्ट्रिक तायक्वांदो २०२३' क्रीडा स्पर्धेत निशा सोलकरला सुवर्ण पदक ; मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या आहे निशा सोलकर.
| प्रतिनिधी : मुंबईतल्या महर्षी दयानंद कॉलेज, परेल ची इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आणि चिल्ड्रन्स तायकाँदो अकादमी, परेल मध्ये प्रशिक्षण घेणारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील मूळ रामगड गांवची कन्या निशा प्रमोद सोलकर हिने ९ जुलैला, सहकार नगर अप्पर प्रायमरी मुनिसिपल स्कूल, वडाळा मुंबईत खेळवल्या गेलेल्या ‘जिल्हास्तरीय तायक्वांदो मुंबई डिस्ट्रिक’ क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये मुलींच्या गटात सुवर्णपदक प्राप्त केले.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत निशा हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ही स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. निशा सोलकर हिने यापूर्वीही अनेक जिल्हा,राज्यस्तरीय तसेच आंतरराज्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेली आहेत. निशा सोलकर ही चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मुंबई परेल येथे प्रशिक्षण घेत असून तिला मुख्य प्रशिक्षक म्हणून सिद्धेश जाधव, संकेत भोसले, सुदेश पवार आणि एम डी कॉलेजचे मार्गदर्शन लाभत आहे . निशा हिला तिचे वडील प्रमोद सोलकर आणि आई पूजा सोलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल महर्षी दयानंद कॉलेज परेल च्या वतीने विशेष अभिनंदन केले आहे. याबरोबरच रामगड, गांवातही तिची प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)