ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जीवन आनंद संस्थेच्या संदिप परब यांनी एका निराधाराला दिला आधार ; निराधार व्यक्ती संविता आश्रमात दाखल.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जीवन आनंद संस्थेच्या संदिप परब यांनी एका निराधाराला दिला आधार ; निराधार व्यक्ती संविता आश्रमात दाखल.

प्रकाशन: 13 Jul 2023 08:25 AM
वाचन संख्या 262

मालवण | सुयोग पंडित : सामाजिक कार्यकर्ते जिल्ह्यातील जीवन आनंद संस्था व संविता आश्रमातील निराधारांना शोधून त्यांना आधार व डोक्यावर छत द्यायचे सामाजिक व्रत अखंड सुरु आहे. या अंतर्गत ११ जुलैला रात्री त्यांनी गोवा येथील म्हापसा टॅक्सी स्टॅंड परीसरातील फुटपाथवर निराधार व्यक्तींच्या समस्या जाणून घेतल्या. नेमकी परिस्थिती काय आहे ते वास्तव जाणण्यासाठी संदीप परब नेहमी फुटपाथवरच झोपून किंवा वावरुन निराधारांबद्दलची माहिती घेतात. यावेळीही त्यांनी तीच पद्धत अवलंबत फूटपाथवर रात्र काढली.

या दरम्यान कृष्णा प्रधान (वय ५०) ह्या निराधार व्यक्तीला आधाराची आवश्यकता आहे हे कळल्यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांच्या मदतीने कायदेशीर बाबी पूर्ण करुन त्यांना संविता आश्रम, येथे दाखल केले. जनसामान्यांचे प्रोत्साहन व कायदा यंत्रणा देत असलेल्या सहकार्यामुळे ही सेवा सुरु आहे अशी प्रांजळ प्रतिक्रिया संदिप परब यांनी माध्यमांना दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स