ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते वाटप.....

जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते वाटप.....

प्रकाशन: 05 Oct 2021 06:40 PM
वाचन संख्या 144

मार्च २०२१अखेरीपर्यंत बॅन्केला झालाय चौदा कोटींचा निव्वळ नफा……!

कणकवली | उमेश परब : बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संपन्न झाली. सभेच्या मान्यतेने संस्थांना लाभांश आदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात वाटप करण्यात आले.

मार्च २०२१ अखेर बँकेस सर्व आवश्यक तरतूदी करून रू. १४ कोटी निव्वळ नफा झाला. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी बँकेच्या नफ्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. गतवर्षी रिझर्व्ह बँकेने कोरोना साथीचा विचार करून संस्थांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होवू नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांनी लाभांश वाटप करू नये. त्याऐवजी लाभांश प्राप्त रक्कम भांडवलामध्ये गुंतवणूक करून बँकेची स्थिरता आणावी, असे सुचविले होते. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती चांगली असूनही बँकेने लाभांश दिलेला नव्हता.

जिल्ह्यातील सहकारी संस्था या जिल्हा बँकेच्या सभासद संस्था असून बँकेच्या भागभांडवलामध्ये त्यांचा प्रमुख वाटा असतो. या भागावर मिळणारा लाभांश हा संस्थांसाठी महत्वाचा असून त्यानुसार संस्था आपल्या सभासदांना लाभांश देत असते. सिंधुदुर्ग बँकेने गतवर्ष वगळता अन्य आर्थिक वर्षामध्ये मार्च २०१७ मध्ये ९.७५%, मार्च २०१९ मध्ये १०.५०%, मार्च २०१९ मध्ये १०.६०% असा चढत्या क्रमाने लाभांश दिला होता. बँकेच्या संचालक मंडळ सभेमध्ये यावर सविस्तर चर्चा होवून, बँकेने संस्थांना सरासरी दिला जाणारा लाभांश विचारात घेवून गतवर्षी राहिलेला लाभांश पुढील एक ते दोन वर्षात टप्या-टप्याने संस्थांना दयावा. चालू वर्षी नियमित लाभाश म्हणून १०% व मागील वर्षापोटी ५% मिळून एकूण १५% लाभांश देण्याची शिफारस वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संपन्न झाली. सभेच्या मान्यतेने संस्थांना लाभांश आदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात वाटप करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स