सारस्वत बँकेच्या निवडणुक यशाबद्दल गौतम ठाकूर यांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.
मान.एकनाथजी ठाकुरांचाच जनहीताचा वारसा जपली जाण्याची आम.नाईक यांनी व्यक्त केली खात्री…
कणकवली | उमेश परब : सारस्वत कॉ.ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत श्री. गौतम एकनाथ ठाकूर यांनी यश मिळविल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील सारस्वत भवन येथे त्यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. श्री. एकनाथजी ठाकूर यांनी केलेल्या कार्याप्रमाणेच गौतम ठाकूर यांनी जनहिताची कामगिरी करावी अशी अपेक्षा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची आहे आणि गौतम ठाकूर नक्कीच त्या अपेक्षा पूर्ण करतील याची खात्री असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)