वेरळ गावचे माजी सरपंच दिगंबर परब कालवश..
शासनाच्या विविध योजनांचा ग्रामस्थांना लाभ व्हावा म्हणून नेहमी झटणारा नेता गेल्याची ग्रामस्थांची भावना…..!
मसुरे |प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वेरळ गावच्या थळकरवाडी येथील गावचे माजी सरपंच व विध्यमान तंटा मुक्त समिती अध्यक्ष दिगंबर श्रीधर परब ( ७५ वर्ष) यांचे उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे निधन झाले. विरण विकास सोसायटीच्या संचालकपदासह अनेक सामाजिक व शैक्षणिक पदांवर ते कार्यरत होते. वेरळ गावच्या जडण घडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. सन १९८० ते ९० या दहा वर्षाच्या काळात त्यांनी सरपंच पद भूषविले होते. शासनाच्या विविध योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असायचे. पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई नातवंडे, चुलत भाऊ, बहिणी असा परिवार आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते धनंजय परब यांचे वडील होत. श्री.दिगंबर परब यांच्या जाण्याने वेरळ व परिसरांतून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)