ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांचा विशेष पुढाकाराने कुडाळ येथे तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी मोफत मार्गदर्शन शिबीर..!

आमदार वैभव नाईक यांचा विशेष पुढाकाराने कुडाळ येथे तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी मोफत मार्गदर्शन शिबीर..!

प्रकाशन: 12 Jul 2023 07:29 AM
वाचन संख्या 217

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फाऊंडेशन कोल्हापूर’ यांचे आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी परीक्षा देऊ इच्छिणार्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आमदार वैभव नाईक यांनी विशेष पुढाकार घेत एक उपक्रम आखला आहे. तलाठी भरती २०२३ साठी जे विद्यार्थी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने तसेच विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन शिबीर घेण्यात येत आहे. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे शनिवार १५ जुलै व रविवार १६ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत हे मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे.

अरुण नरके फौडेशन कोल्हापूर ही संस्था स्पर्धा परीक्षा व सामाजिक क्षेत्रातील २६ वर्षांचा अनुभव असणारी विश्वनीय संस्था आहे. आजपर्यंत त्यांचे ४६५० विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत कार्यरत आहेत. या संस्थेचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्हावे आणि सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी तलाठी व्हावेत यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवलीच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या तलाठी भरतीच्या मोफत मार्गदर्शन शिबीराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घावा, त्यासाठी आपली नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी १४ जुलैपर्यंत श्री. समीर कुंभार मोबा- ९१४२४३४४४८ श्री. तेजस मडवळ मोबा- ८७६७०९५०११ यांच्याकडे करावी असे आवाहन विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.

या विशेष शिबिराचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स