ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे गांवचे 'पत्रसुपुत्र' श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर संस्थेच्या सदस्यपदी निवड.

मसुरे गांवचे 'पत्रसुपुत्र' श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर संस्थेच्या सदस्यपदी निवड.

प्रकाशन: 12 Jul 2023 08:45 AM
वाचन संख्या 221

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील, गेली २५ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म, सहकार व पत्रकार क्षेत्रात योगदान देणारे श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांची ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर’ संस्थेच्या सदस्यपदी नुकतीच करण्यात आली.

या निवडीच्या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र चेंबर कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर संस्थेचे अध्यक्ष श्री ललित गांधी, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री आशिष पेडणेकर यांच्या हस्ते दत्तप्रसाद पेडणेकर यांना इचलकरंजी येथे शुभेच्छा देण्यात आल्यात. या वेळी कल्लाप्पा आण्णा जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,जव्हार इंडस्ट्रीज संचालक रोहित आवडे, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उपाध्यक्ष नितीन बंग, भालचंद्र राऊत, मनोज वालावलकर, सीमा शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवडी बद्दल श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांचे मसुरे ग्रामस्थ, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, उद्योजक दीपक सावंत, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक निनाद धुरी, उद्योजक संतोष परब, समर्थ सहकारी पतपेढी मुंबई अध्यक्ष प्रकाश परब, समाजसेवक बाबा परब, माजी जि.प. अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, सरपंच संदीप हडकर, छोटू ठाकूर, महेश बागवे, विलास मेस्त्री, उद्योजक मिलिंद प्रभू, सुनील मयेकर, सावंत यांनी सुद्धा अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स