ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर संस्थेच्या कार्यकारिणी मंडळावर निवड.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर संस्थेच्या कार्यकारिणी मंडळावर निवड.

प्रकाशन: 12 Jul 2023 06:34 AM
वाचन संख्या 411

सामाजिक क्षेत्रातील विविध पदांवर सक्रीय असलेल्या ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची सर्व स्तरांतून प्रशंसा.

मालवण | सुयोग पंडित : शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्या व व्यापार , कृषी व उद्योग क्षेत्रात राज्याचा पाया रचणार्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स , ॲन्ड ॲग्रीकल्चर’ संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ तथा गवर्नींग काऊन्सीलवर वेंगुर्ले येथील ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, ॲन्ड ॲग्रीकल्चर संस्थेने ‘व्हिजन २०२७’ असा एक रोड मॅप आखला असून त्या पार्श्वभूमीवर ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची ही निवड अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

ॲड. नंदन वेंगुर्लेकर सध्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक, अर्थकारण, उद्योग, न्याय, व्यापार,पर्यावरणाशी निगडीत अशा विविध पदांच्या जबाबदार्या भूषवत असून ती पदे
‘आधार फाऊंडेशन सिंधुदुर्ग (सचिव ), कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग ( उपाध्यक्ष), महाराष्ट्र राज्य जिमनॅस्टिक असोसिएशन (राज्य उपाध्यक्ष) महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ( संचालक), सिंधुदुर्ग जिल्हा चेस असोसिएशन ( सदस्य), सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशन( सचिव), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ( सिंधुदुर्ग शाखा व्यवस्थापक), CRZ जिल्हास्तरीय समन्वय समिती ( कोकण विभाग समन्वयक), सिंधुदूर्ग जिल्हा भंडारी सहकारी पतसंस्था मर्यादित, वेंगुर्ला ( माजी चेअरमन व विद्यमान संचालक), कोस्टल बेल्ट डेव्हलपमेंट संस्था, सिंधुदुर्ग ( संस्थापक व सदस्य), कोकण स्टुडंट युथ फेडरेशन,कोल्हापूर( NGO), संस्थापक व सदस्य), तसेच संस्थापक व सदस्य, वेंगुर्ला तालुका स्पोर्टस वेलफेअर असो, वेंगुर्ला, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बीपीएड बेरोजगार संघटना, सिंधुदूर्ग अध्यक्ष, वेंगुर्ला तालुका क्रिडा समन्वय समिती, वेंगुर्ला, सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा खो खो असोसिएशन, सिंधुदुर्ग, सहसचिव, नगरवाचनालय, वेंगुर्ला,माजी सदस्य, तालुका क्रीडा संकुल समिती, वेंगुर्ला, सदस्य, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन, महाराष्ट्र, माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग, सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन, सिंधुदुर्ग
सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन, सिंधुदुर्ग’, इतकी विविध स्तरीय आहेत.

महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, ॲन्ड ॲग्रीकल्चर या संस्थेच्या स्विकृत सदस्यपदी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातून प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स