ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सक्त सूचना.

पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सक्त सूचना.

प्रकाशन: 11 Jul 2023 09:59 AM
वाचन संख्या 208

सामान्य जनतेचे होणारे हाल यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे केले प्रतिपादन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस सिंधुनगरी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत नुकतीच एक आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामाबाबत मोनोपॉली करुन सिंधुदुर्ग सारख्या पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांची व अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करा असे सक्त आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी आढावा दिला. यानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले चार-चार वेळेला निविदा काढूनही जर कोणी ठेकेदार निविदेसाठी येत नसेल तर या जिल्ह्याला वेठीस धरणारा प्रकार आहे. ठेकेदारांची मोनोपॉली दिसून येते. अशा ठेकेदारांची आणि त्यांना मदत करणारे अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.
ठेकेदार आणि बेजबाबदार अधिकारी यांच्यामुळे सामान्य जनतेची गैरसोय होत आहे. शासनाच्या माध्यमातून विविध रस्ते योजांनासाठी निधी मंजूर होत आहे परंतु ठेकेदारांचा आडमुठेपणा व काही अधिकारींचा बेजबदारपणा यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहे पण यापुढे हे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारही मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स