ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पंचगिरी सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा उपक्रम संपन्न ; कार्यशाळेच्या माध्यमातून २० जिल्ह्यातील पंचांना मार्गदर्शन.

पंचगिरी सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा उपक्रम संपन्न ; कार्यशाळेच्या माध्यमातून २० जिल्ह्यातील पंचांना मार्गदर्शन.

प्रकाशन: 11 Jul 2023 06:55 AM
वाचन संख्या 582

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्यातील क्रिकेट पंचांचे ज्ञान वृद्धिंगत करुन पंचगिरीचे व पर्यायाने पंचांचेही प्रगल्भ सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) महाराष्ट्र राज्यातील २० जिल्ह्यातल्या क्रिकेट पंचांकरिता ५ केंद्रे निश्चित केली. त्यानुसार ६ जुलै ते ९ जुलै या कालावधीत पंचांसाठी विशेष मार्गदर्शक अशा कार्यशाळेचे आयोजन केले गेले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील एकूण १९० क्रिकेट पंचांनी सहभाग नोंदवला. रत्नागिरी येथे झालेल्या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंच दिनेश कुबडे, संदीप रुद्रे, दिपक धुरी, गोविंद केरकर ( बंटी केरकर ), राहुल रेगे असे अनुभवी पंच तर रामप्रसाद शिर्के, हेमेंद्र मेस्त, वल्लभ घोटगे, अमोल मेस्त्री, कुडाळकर अशा होतकरू व एकूण १० पंचांनी सहभाग नोंदवला.

सध्या पावसाळी मोसम असल्याने मैदानावरील स्पर्धात्मक क्रिकेटला जरी विश्रांती असली तरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तांत्रिक अभ्यास व पंचांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आखलेल्या या उपक्रमाबद्दल क्रीडा तज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स