ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम संपन्न ; अपरिचीत व दुर्गम गड किल्ले संवर्धनासाठी कार्यरत असणारे दुर्गवीर प्रतिष्ठान.

किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम संपन्न ; अपरिचीत व दुर्गम गड किल्ले संवर्धनासाठी कार्यरत असणारे दुर्गवीर प्रतिष्ठान.

प्रकाशन: 10 Jul 2023 07:49 PM
वाचन संख्या 127

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने आज १० जुलैला श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती.

सकाळी ८ वा. सर्व दुर्गवीर किल्ले रामगडवर जमा झाले. प्रथम गडदेवता, श्री गणेशाची ची आराधना करुन शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये मोहिमेस प्रारंभ केला. पावसाचे दिवस असल्यामुळे गडांवरील वास्तू, अवशेष यांवर गवत झाडी उगवल्याने वास्तू झुडूपात झाकून जातात. यामुळे वास्तूंचे नुकसान होतेच शिवाय पावसाळ्यात गडावर येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण गडफेरी होत नाही. याच गोष्टीची दखल घेऊन या मोहिमेत गडावरील गणेश मंदिर परिसरातील झाडी गवत साफ करत, मंदिर परिसर मोकळा करण्यात आला.

या मोहिमेत दुर्गवीरचे मिलिंद चव्हाण, गणेश मालंडकर, तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, रोहन साटम, रामगडचे व्यावसाईक भालचंद्र पवार, मगर आदी सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्रातील दुर्गवीर प्रतिष्ठान २००८ पासून अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. गडकिल्ले संवर्धना सोबतच विविध सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक मराठमोळे सण उत्सव गडावर साजरे करून गड जागता ठेवत स्थानिकांमध्ये गडांबद्दल आस्था निर्माण करण्याचा दुर्गवीर प्रतिष्ठानचा संकल्प आहे. परंतु सदर कार्य हे नक्कीच कुणा एका दोघांच्या आवाक्यातील नाही. यासाठी गरज आहे ती कित्येक हातांची म्हणूनच सर्व गडप्रेमी आणि शिवप्रेमींनी या गडसंवर्धन कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स