सिंधुभार्गव मित्र मंडळातर्फे महा रक्तदान शिबिराचे आयोजन ; 'चला रक्तदान करुया..तीन जीव वाचवुया' या संकल्पनेवर शिबिराचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु भार्गव मित्रमंडळ यांच्या तर्फे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी १५ जुलैला सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत कुडाळ तालुक्यातल्या पावशी इथल्या शांतादुर्गा मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘चला रक्तदान करुया …तीन जीव वाचवुया’ अशा संकल्पनेतून हे शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिराविषयी अधिक माहितीसाठी श्री. समीर रुणकर ९६७३१३००९५, ॲड. विवेक गोखले ९४०४९०६६९३, श्री. विघ्नेश गोखले ८२०८४३०५००, श्री. मंदार सरजोशी ९४०४९३१९९० यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त जणांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)