लायन्स क्लब मालवणच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारी मंडळाच्या शपथविधी व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष ला. श्री. विश्वास गांवकर व कार्यकारी मंडळ यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी ९ जुलैला आयोजीत करण्यात आला आहे. दैवज्ञ भवनात संपन्न होणार्या या सोहळ्याला एम जे एफ लायन राजेंद्र शहा कांसवा ( रिजन चेअरमन, रिजन -१ ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्याला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन मावळत्या अध्यक्ष ला. सौ. वैशाली शंकरदास, खजिनदार ला. सौ. अंजली आचरेकर तसेच सचिव ला. सौ. अनुष्का चव्हाण यांनी केले आहे.
यानिमित्ताने सोहळ्याला शुभेच्छा द्यायला येणार्या सर्व प्रार्थनीय नागरीकांनी हार, पुष्पगुच्छ या पेक्षा शैक्षणिक साहित्य आणले तर ते जास्त उचित् व समाजोपयोगी ठरेल अशी अभिनव संकल्पना लायन्स क्लब मालवण यांनी आवाहना द्वारे व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)