कणकवलीत संस्कृत भारती कोकण प्रांत आयोजीत 'संस्कृत संभाषण' शिबीराचा शुभारंभ ; १३ जुलै पर्यंत चालणार शिबीर.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात ‘संस्कृत भारती कोकण प्रांत’ यांच्या तर्फे संस्कृत संभाषण शिबीराला काल प्रारंभ झाला. कणकवली बस आगारासमोरील उत्कर्ष उपहारगृहाच्या वरचा मजल्या वर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्कृत संभाषण शिबिरात पहिल्या दिवसापासूनच ‘संस्कृतमधून बोलूया’ अशी संकल्पना आहे. यात १५ वर्षे व वरील वयोगटातील खुला वर्ग सहभागी होऊ शकतो.
‘वही नको, पेन नको, संस्कृतचे पूर्वज्ञान असण्याची गरज नाही,
व्याकरण पाठांतर नाही, हसत खेळत संस्कृत, संस्कृत गाणी आणि गोष्टी’ अशी या शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एका कुटुंबातील २ किंवा अधिक सदस्य सहभागी झाल्यास सरावदृष्ट्या लाभदायक असल्याचे आयोजकांनी सांगितले असून हे शिबीर संपूर्ण निःशुल्क आहे. २३ जुलै २०२३ पर्यंत संध्याकाळी ५ ते ०६:३० अशी शिबिराची वेळ आहे.
- या शिबिरा संदर्भात शंका, प्रश्न किंवा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ९४०३०९९९७८ / ९२८४२२४५४७ / ९४२०७४२०५५ /
९४२०७३९८६९ / ९०२२२०१२१४.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)