ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख साई काणेकर यांची ग्रामपंचायत साठी कचरा गाडीची मागणी ; आ. दीपक केसरकर यांचे वेधले लक्ष.

ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख साई काणेकर यांची ग्रामपंचायत साठी कचरा गाडीची मागणी ; आ. दीपक केसरकर यांचे वेधले लक्ष.

प्रकाशन: 01 Jul 2023 05:22 PM
वाचन संख्या 218

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ग्रामपंचायत कडे सध्या असलेल्या कचरा गाडीमध्ये वारंवार बिघाड होत असतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या नागरिकांना भेडसावते. याची दखल घेत आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे बांदा ग्रामपंचायतसाठी कचरा गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख (उद्धव ठाकरे गट) साई काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रिया येडवे, देवल येडवे यांनी केली.

सावंतवाडी येथे भेट घेत बांदा शहरातील समस्या मंत्री मा.दिपक केसरकर यांना सांगितली. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तसेच कचरा व्यवस्थापन नियोजनबद्ध करण्यासाठी अजून एका स्वतंत्र कचरा गाडीची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत असलेल्या गाडीमध्ये बिघाड होत असतो. परिणामी याचा नाहक त्रास व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे अजून एका गाडीची आवश्यकता असल्याचे साई काणेकर यांनी मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा गावातील कचरा गाडी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती श्री. काणेकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स