ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बँक ऑफ बड़ोदा कणकवली शाखेच्या ॲथोराइजड् बिझनेस सेंटरचे आमदार नितेश राणे व प.पू.सदगुरू गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत उदघाटन.

बँक ऑफ बड़ोदा कणकवली शाखेच्या ॲथोराइजड् बिझनेस सेंटरचे आमदार नितेश राणे व प.पू.सदगुरू गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत उदघाटन.

प्रकाशन: 01 Jul 2023 06:18 PM
वाचन संख्या 217

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील बँक ऑफ बड़ोदाच्या ॲथोराइजड् बिझनेस सेंटरचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन संपन्न झाले. ग्राहकांची गरज ओळखून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. २९ जूनला हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कणकवली तहसिलदार मा. आर.के.पवार, बँक आँफ बडोदा, कणकवली शाखा व्यवस्थापक सुरेश चौहान, बिझनेस सेटंर च्या व्यवस्थापिका स्वाती सुतार , दिलीप सुतार गौरव मुंज, योगेश ताम्हाणेकर, दादा पावसकर, सरपंच शुक्राचार्य चौथे उपस्थित होते. व्यवस्थापिका स्वाती सुतार यांनी ग्राहकांनी सेंटरच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स