ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कळसुली गावातील मुख्य मार्गावरील झाडी देतेय अपघाताला आमंत्रण...!

कळसुली गावातील मुख्य मार्गावरील झाडी देतेय अपघाताला आमंत्रण...!

प्रकाशन: 05 Oct 2021 12:17 PM
वाचन संख्या 182

दुतर्फा झाडी तोडून रस्ता निर्धोक करण्याची अतुल दळवी मागणी

कणकवली | उमेश परब : कळसुली मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि अपघाताला आमंत्रण देणारी झाडी तोडून रस्ता निर्धोक बनवावा,अशी मागणी कळसुली माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.सदस्य अतुल दळवी यांनी केली आहे. कळसुली शिवडाव फाटा ते कळसुली पुनर्वसन पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा झाडी व पडलेले खड्ड्याकडे संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी या कळसुली गावातील रस्त्याकडे निदान एकदा तरी फेरी मारावी आणि रस्त्याची झालेली दुर्दशा पाहावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कळसुली पोस्ट ऑफिस नजीक शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते, या मोरी दरम्यान दुतर्फा झाडी वाढली असून नवख्या वाहनचालकाना वळणांवर पुढील वाहनांचा अंदाज येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडी अभावी अपघाताची मालिका सुरू आहे आहे.मोठी दुर्घटना घडल्यास बांधकाम विभाग जबाबदार आहे?
या सगळ्या बाबींचा विचार करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावा आणि आठवडाभरात तो रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक बनवावा अन्यथा आम्हाला ग्रामस्थांना सोबत घेवून आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशाराही दळवी यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स