ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जानवली येथे अपघात ; आरोग्यसेवक गंभीर...!

जानवली येथे अपघात ; आरोग्यसेवक गंभीर...!

प्रकाशन: 05 Oct 2021 11:55 AM
वाचन संख्या 186

धडक देणारा कारचालक अपघातानंतर पसार

कणकवली | उमेश परब : कणकवलीहून जानवली ग्रामपंचायत येथे लसीकरण मोहिमेसाठी येत असलेले वरवडे आरोग्य केंद्रचे आरोग्य सहाय्यक विजय जाधव आणि त्यांच्या मागे दुचाकीवर बसलेल्या आरोग्यसेविका नीलम गवाणकर यांना समोरून येणाऱ्या कारची धडक बसल्याने दोघेजण जखमी झाले. जानवली ग्रामपंचायतच्या दिशेने वळत असताना समोरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारची जोरदार धडक बसली. या धडकेत आरोग्यसेवक जाधव आणि आरोग्यसेविका गवाणकर रस्त्यावर फेकल्या गेल्या. बराच वेळ ते रस्त्यावर पडलेल्या स्थितीत आहेत अशी माहिती मिळतात शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, दामू सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुचाकीला धडक देऊन पसार झालेल्या स्विफ्ट कार मालकाचा पोलिस शोध घेत असून यातील आरोग्य सेवक विजय जाधव यांची यांच्या पायाला जबर मार बसल्याने फॅक्चर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स