ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बाॅलिवुड अभिनेत्री व समाज सेविका सौ. अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी येथील चौडेश्वरी फाऊंडेशनचा कलाकार मेळावा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बाॅलिवुड अभिनेत्री व समाज सेविका सौ. अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी येथील चौडेश्वरी फाऊंडेशनचा कलाकार मेळावा संपन्न.

प्रकाशन: 29 Jun 2023 11:01 AM
वाचन संख्या 325

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या सुप्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री व समाज सेविका सौ. अक्षता कांबळी यांच्या उपस्थितीत रविवारी २५ जूनला श्रीमंत ना . बा .घोरपडे नाट्यगृह येथे चौडेश्वरी फाऊंडेशन इचलकरंजी यांच्या वतीने कलाकार मेळावा संपन्न झाला . महाराष्ट्रातील विविध भागांतील विणकर समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .यावेळी सिधुदुर्ग तील सुप्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या . तसेच हातकंगले च्या तहसीलदार कल्पना भंडारे याही विशेष उपस्थित होत्या .

चौडेश्वरी कला महोत्सव हा श्री देवांग समाज (रजि.)इचलकरंजी यांच्या अधीपत्याखाली २०१६ साली जेष्ठ अमावस्येचे औचित्य साधत स्थापन करण्यात आला होता .यामध्ये समाजातील कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा व त्यांना विनासायास कलेचा मंच उपलब्ध व्हावा हा एकमेव हेतू होता . गेली आठ वर्षे हा कार्यक्रम स्थानिक कलाकारा साठी केला जातो . ह्या वर्षी सिंधुदुर्ग तील सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली . १० वर्ष पासून ते ६० वर्षापर्यंतच्या कलाकारांनी सहभाग घेऊन कार्यक्रम सादर केला .

कार्यक्रमाच्या शेवटी अक्षता कांबळी ह्यांनी कलाकारांना बहुमूल्य कला व जीवन मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या व्यग्र दिनक्रमातून समाजासाठी वेळ देत उपस्थित राहिल्या बद्धल चौडेश्वरी फाऊंडेशन चे अध्यक्ष विश्वनाथजी मुसळे , युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रमोद मुसळे यांनी अक्षता कांबळी यांचे आभार मानले.

यावेळी कार्यक्रम स्थळी जनता बॅंकचे चेअरमन संजय अनिगोळ, प्रशांत सपाटे अमोल डाके , विनायक सोनटक्के तसेच नाशिक , पुणे , लातूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स