हळवल फाटा येथे दोन कार मध्ये अपघात…
एकेरी मार्ग धोकादायक ; प्रशासन सुशेगात
उमेश परब / कणकवली : कणकवली वरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला कसाल वरून येणाऱ्या बोलेरोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सकाळी ६ वाजण्याच्या च्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात प्रवाशांना दुखापत झाल्याचे त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते आहे.
हा अपघात गडनदी ब्रिजजवळील हळवल फाट्यावर झाला असून डायवर्षनच चा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघात एवढा जोरदार होता की दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पोलिस तातडीने दाखल होत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. नाईक प्रेटोल पम्प ते हळवल फाटा पर्यंत एकेरी मार्ग असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकाला अंदाज येत नसल्यामुळे हे अपघात घडत आहे वारंवार लक्ष वेधुनही प्रशासन सुशेगात असल्याने वाहनचालक व प्रवासी यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)