ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शाळेचे छप्पर कोसळले..! ( लक्षवेधी )
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शाळेचे छप्पर कोसळले..! ( लक्षवेधी )

प्रकाशन: 12 Jun 2023 12:22 PM
वाचन संख्या 229

मडुरे प्राथमीक शाळेची इमारत धोकादायक आहे म्हणून निवडणुक प्रक्रिया होत नाही परंतु शाळा सुरु करायला प्रशासनाचा विरोध नाही अशी यंत्रणेची ‘शैक्षणिक आस्था !’

बांदा | राकेश परब ( लक्षवेधी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसातच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला. गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, शिक्षण विभाग अधिकार्‍यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी ग्रामस्थांनी केला आहे.


  
मडुरा प्राथमिक शाळा नं. ३ चे छप्पर नादुरुस्त झाले होते. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता अशी वेगवेगळी कारणे पुढे करुन चालढकल करण्यात येत होती. मडुरा शाळा क्र. १ ची सुद्धा अशीच अवस्था आहे. धोकादायक इमारतीमुळे त्याठिकाणी प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत नाही. मात्र, शाळा सुरु करण्यास प्रशासनाचा विरोध नाही अशी हास्यास्पद परिस्थिती आहे व अशी विरोधाभासी शैक्षणिक आस्था आहे.

मडुरा सरपंच उदय चिंदरकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, दिनेश नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. दोन दिवसातच शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने छप्पराची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स