ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव ८ जुलै रोजी होणार संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव ८ जुलै रोजी होणार संपन्न.

प्रकाशन: 12 Jun 2023 01:24 PM
वाचन संख्या 407

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवची मूळमाया अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव ८ जुलै २०२३ रोजी संपन्न होत आहे. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी, देवीचे राज्याबाहेरील भक्त सुद्धा या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असल्याने भाविकांचा जनसागर यादिवशी बिळवस येथे दिसून येतो.

जत्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे ८ जुलै रोजी सकाळी विधीवत पूजन झाल्यानंतर भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणे, तसेच ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सातेरी देवालय ट्रस्ट व समस्त बिळवस ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स