ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कार अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह एकाच मृत्यू…!

कार अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह एकाच मृत्यू…!

प्रकाशन: 04 Oct 2021 03:55 PM
वाचन संख्या 111

आचरा मालवण मार्गावरील घटना….


रविवार उशीरा रात्री घडला अपघात

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवार रात्री एक दुर्देवी व ह्रदयद्रावक अशी घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने तिघांचा दोघांचा जीव घेतला आहे. यासंबंधी हाती आलेल्या सविस्तर वृत्तानुसार एका भरधाव वेगाने आलेल्या कारने तिघा पादचाऱ्यांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पालघर येथे सेवेत असणार्या येथील एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एकाच मृत्यू झाला आहे.सदर दुर्घटना रविवारी रात्री घडली. मृत पोलिस उपनिरीक्षकांची मुलगी ही सदर अपघातात जखमी झाली आहे.
अपघातात मृत झालेल्या पोलीस उपनिरीक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे. (वय -४७, सध्या रा. आचरा, वरचीवाडी) हे पालघर जिल्ह्यात सेवेत आहेत. त्यांच्यासह जमेंदर प्रसाद (वय ५०, रा. आचरा, वरचीवाडी) यांचा कणकवली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर मुलगी परी लोणे (वय १७) यांच्यावर उपचार सुरु आहेत.
उपनिरीक्षक दीपक लोणे व आपली मुलगी परी लोणे व सहकारी जमेंदर प्रसाद यांच्यासोबत रविवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघाले होते. याचवेळी आचरे हायस्कूल समोरीच्या परिसरातील रस्त्यावर पाठीमागून आलेल्या कारने तिघांना धडक दिली. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिन्ही जखमींना ग्रामस्थांनी व पोलीस यांनी आचरा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आले व त्यानंतर कणकवली येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान दीपक लोणे व जमेंदर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या अपघात प्रकरणी कार चालक कृष्णा राणे (वय ६०, रा. जानवली, कणकवली) यांच्या विरोधात आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स