मसुरे कावावाडी येथील जयश्री पेडणेकर यांचे निधन.
मसुरे परिसरांत व्यक्त होत आहे शोक….
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे,कावावाडी येथील श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर (८७ वर्ष) यांचे काल दिनांक 03 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना, दिर, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मसुरे भरतगड सहकारी पतपेढी मर्यादित मुंबईचे अध्यक्ष शरद पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ता बबन पेडणेकर यांच्या मातोश्री तर टेम्पो व्यावसाईक युवा कार्यकर्ते समीर पेडणेकर, सर्प मित्र रमण पेडणेकर यांच्या काकी होत.
आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयश्री पेडणेकर यांच्या जाण्याने मसुरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)