ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
श्री. नंदकुमार पेडणेकर ठरले राज्यस्तरीय 'स्वामी रत्न..!'
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री. नंदकुमार पेडणेकर ठरले राज्यस्तरीय 'स्वामी रत्न..!'

प्रकाशन: 01 Jun 2023 05:10 PM
वाचन संख्या 281

सामाजिक व अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन पुणे येथे गौरव ; हडपीड येथे भव्य दिव्य स्वामी मठ उभारण्यात मोठे योगदान असणारे स्वामी भक्त आहेत नंदकुमार पेडणेकर..!

मसुरे | प्रतिनिधी : समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोट संचलित समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समितीच्या वतीने हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांना ‘स्वामी रत्न’ या राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत सौ. नीलम नंदकुमार पेडणेकर उपस्थित होत्या.

पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात असंख्य स्वामीभक्तांच्या साक्षीने झालेल्या संदेश स्वामींचा या सोहळ्यात पेडणेकर यांच्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आले. श्री क्षेत्र अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वे. शां. सं. अण्णू महाराज यांच्या शुभहस्ते त्यांना स्वामींची शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास राज्यातून अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत समर्थ नगरीचे अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांनी केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे व वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले, नंदकुमार पेडणेकर यांचे स्वामी कार्य मोठे आहे. कोकणात देवगड तालुक्यात हडपीड येथे भव्य दिव्य स्वामी मठ उभारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मठाच्या माध्यमातून स्वामी भक्तांना अक्कलकोट दर्शन, आरोग्य शिबीर, ओसाड जमिनीवर वृक्ष लागवड, शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांसाठी विशेष योजना ते राबवत असतात. स्वामी नामाचा प्रचार प्रसार होण्यासाठी मोठे योगदान पेडणेकर यांचे आहे. मठाच्या माध्यमातून आज अखेर स्वामींचा प्रचार प्रसार व्हावा या शुद्ध हेतूने अनेक स्वामीमय उपक्रम राबवून हजारो स्वामी भक्त त्यांनी तयार केले आहेत. पेडणेकर यांनी आज अखेर जी स्वामी सेवा केली आहे, जे चांगले कार्य केले आहे त्या सेवेची एक त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप म्हणून हा त्यांचा आज हा गौरव होत आहे.

याचा मला अभिमान आहे. दुसऱ्यांना स्वामी सेवा करण्यास प्रोत्साहन देणारे स्वामी भक्त तयार व्हायला हवेत असेही ते म्हणाले. कार्यक्रम प्रसंगी पुणे येथील प्रसिद्ध गायिका कृपा नाईक यांनी गायलेल्या स्वामींच्यावर आधारित भक्ती गीतांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले. तसेच स्वामींच्या रक्तचंदन पादुकांचे दर्शन, नामस्मरण व शंकरबाबा महाराज यांच्या शीधा प्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमास पुणे येथील स्वामी भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स