आडारीतील शिवसैनिकाच्या कन्येचा आ. वैभव नाईक यांनी घरी जाऊन केला शैक्षणिक यशाबद्दल विशेष सत्कार ; तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळच्या आडारी येथील शिवसैनिक श्रीराम गांवकर यांची कन्या कु. श्रावणी श्रीराम गांवकर हिने यंदा १२ वीच्या परीक्षेत मालवण भंडारी ज्यू.कॉलेज मध्ये विज्ञान शाखेत ७०.५०% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी तिच्या घरी भेट देऊन शाल श्रीफळ देत तिचा सत्कार केला व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, संमेश परब, सिद्धेश मांजरेकर, श्री व सौ गांवकर उभयता पालक दांपत्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)