ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शुभमन गीलच्या वादळी खेळीने आरसीबीचे आयपिएल चषकाचे स्वप्न भंगले ; विराट कोहलीच्या तुफानी ऐतिहासिक शतकानंतरही गुजरात टायटन्सनचा विजय.

शुभमन गीलच्या वादळी खेळीने आरसीबीचे आयपिएल चषकाचे स्वप्न भंगले ; विराट कोहलीच्या तुफानी ऐतिहासिक शतकानंतरही गुजरात टायटन्सनचा विजय.

प्रकाशन: 22 May 2023 04:49 AM
वाचन संख्या 701

आरसीबीच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफ मध्ये दाखल.

क्रीडा | विशेष : आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये सर्वात आधी पोहोचलेल्या गुजरात टायटन्सने काल आरसीबीच्या आयपिएल चषकाच्या स्वप्नांना जबरदस्त धक्का दिला. गुजरातच्या शुभमन गिलने तुफानी शतकी खेळी करत आरसीबी आणि विराट कोहलीच्या स्वप्नांवर अकरशः पाणी फेरले. शुभमन गिलच्या फलंदाजीने मुंबई इंडियन्स मात्र प्लेऑफ मध्ये दाखल झाले आहेत .

काल बंगळुरु मध्ये गुजरातविरोधात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९८ धावांचे लक्ष्य ठेवले. यात विराट कोहलीचे धडाकेबाज शतकही होतं. सामन्यात विराट मैदानात उतरलाच मोठ्या खेळीच्या इराद्याने. विराटने शतकी खेळी केलीही. विराटने या सामन्यात ३५ चेंडूत अर्धशतक तर ६० चेंडूत शतक झळकवलं. विराट काल सामन्यातही नाबाद राहिला. विराटला फाफ डु प्लेसिस आणि मॅक्सेल यांनी साथ दिली. विराटने फलंदाजीवेळी आरसीबीची एक बाजू लावून धरली. आरसीबीची धावसंख्या २०० च्या जवळ नेऊन ठेवली. विराटने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. आरसीबीने विराटच्या शतकाच्या जोरावर ५ गडी गमवत १९७ धावा केल्या.

आरसीबी मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरली होती. फलंदाजीनंतर गुजरातविरोधात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीही चांगली केली. पण शुभमन गिलही मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठीच मैदानात उतरला, असाच खेळला. शुभमन गिल यांनी तडाखेबाज फलंदाजी केली. शुभमन गिल याने ५२ चेंडूत शतक झळकावलं. शुभमन गिलच्या या शतकाच्या जोरावर गुजरातने तगडा संघ असलेल्या आरसीबीवर विजय मिळवला. विराटने सलग दोन सामन्यात शतक झळकवलं. तर शुभमन गिलने आयपीएलमधलं दुसरं शतक केलं. गिलने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकांसह शतक झळकावलं. गुजरातला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल हे दोन्ही चांगले खेळले. पण या सामन्यातील पराभवामुळे आरसीबी बाहेर गेली. यामुळे आयपीएलमधील प्लेऑफमध्ये जाण्याचा आणि आयपीएल जिंकण्याचं आरसीबीचं आणि विराट कोहलीचं स्वप्न भंगलं. आयपीएलमधून आरसीबी बाहेर गेल्याने विराटच्या चेहऱ्यावर सामन्यानंतर निराशा दिसून आली. विराटने शतकी खेळी केली, पण आरसीबीला विजय मिळवता आला नाही.

कालचा दिवस हा आयपिएल इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरला कारण काल एकाच दिवशी आयपिएल मध्ये ३ शतकांची नोंद झाली. आधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स तर्फे कॅमेरन ग्रीनने तुफानी शतक ठोकले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स