ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवा समाज कार्यकर्ता   निलेश कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

युवा समाज कार्यकर्ता निलेश कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

प्रकाशन: 21 May 2023 10:18 PM
वाचन संख्या 487

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील युवा सामाजिक कार्यकर्ता निलेश कदम यांनी नुकतेच आपल्या वाढदिवसच्या निमित्ताने बांदा शहरातील  गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पालकत्व स्वीकारत एक वेगळा आदर्श समाजासमोर
ठेवला.  निलेश कदम नेहमीच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम दरवर्षी करत आहेत. मागील वर्षी त्यांनी आरोग्य विषयक उपक्रम राबवला होता . यावर्षी त्यांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेत बांदा परिसरातील गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. हा कार्यक्रम नुकताच बांदा प्राथमिक शाळेत संपन्न झाला.


      
बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी ही आपल्या मनोगतात म्हणाले की निलेश कदम अशा प्रकारचे उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबवत आहेत व आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने काम केल्यास निश्चितच समाजशील समाज उभा राहू शकतो.  या वेळी बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्रेया केसरकर, माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, माजी सदस्य मकरंद तोरसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सिद्धेश महाजन, डेगवेचे माजी सरपंच प्रवीण देसाई, बाबा काणेकर, शैलेश केसरकर, संदीप बांदेकर, नीलेश देसाई, साई धारगळकर, साहिल कल्याणकर, ऋषी हरमलकर, सुनील धामापूरकर, राकेश परब, सिद्धेश नाईक, सागर सावंत, पनो येडवे आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी कदम यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या १० मुलांसह कदम यांनी उमेद फाउंडेशनच्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत अजून २ विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स