शतकवीर ग्रीन सह रोहित शर्माचा सूर जुळला आणि मुंबईने इंडियन्सने महत्वाचा विजय साकारला ; १६ गुणांसह प्ले ऑफच्या आशा जिवंत.
अजुनही बेंगळुरुला मुंबईला मागे टाकायची संधी..!
आचरा | प्रसाद टोपले : न भूतो न भविष्यती अशा आयपिएल २०२३ मोसमातील करो या मरो सामन्यात मुंबई इंडियन्सने मोठा विजय साकारला आणि त्यांनी प्ले ऑफच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. हैदराबादच्या २०१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनने नाबाद शतक झळकावले, त्यामुळेच मुंबईच्या संघाला विजय मिळवता आला.
हैदराबादच्या २०१ धावांचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला १४ धावा करता आल्या. पण इशान बाद झाला आणि त्यानंतर तुफानी नाबाद शतकवीर कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. ग्रीन यावेळी रोहितपेक्षा जास्त आक्रमक होता आणि त्यामुळेच त्याने रोहितनंतर येऊनही त्याच्यापूर्वी आपले अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर रोहितही शांत बसला नाही, रोहितनेही चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. पण रोहितला त्यानंतर जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कारण रोहित यावेळी ५६ धावांवर बाद झाला.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याला हा निर्णय किती चुकीचा होता हे हैदराबादच्या सलामीवीरांनी दाखवून दिले. हैदराबादच्या सलामीवीरांनी यावेळी सुरुवातीलाच आपले इरादे स्पष्ट केले होते. कारण हैदराबादच्या विव्रांत शर्मा आणि मयांक अगरवाल या जोडीने संघआला दमदार सुरुवात करून दिली होती. या जोडीने १३.५ षटकांत १४० धावा फलकावर लावल्या होत्या. या दोघांनी १० च्या सरासरीने फटकेबाजी केली आणि मुंबईच्या गोलंदाजीची हवाच काढून टाकली होती. पण अखेर विव्रांत बाद झाला आणि मुंबईला पहिले यश मिळाले. विव्रांतने यावेळी ४७ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यापूर्वी त्याचे नाव कुणालाच माहिती नव्हते. पण या एका खेळीमुळे त्याचे नाव संपूर्म क्रिकेट विश्वाला समजले. आतापर्यंतच्या सामन्यांत मयांक अगरवालला चांगला सूर गवसला नव्हता. पण या सामन्यात मात्र त्याला चांगली लय सापडली. कारण मयांक यावेळी शतकासमीप आला होता. पण त्याचे शतक १७ धावांनी हुकले. मयांकने यावेळी ४६ चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८३ धावांची खेळी साकारली. या दोन्ही सलामीवीरांच्या जीवावर हैदराबादच्या संघाने २०० धावा २० षटकांत केल्या होत्या.
मुंबई इंडियन्सने यापूर्वी वानखेडेच्या मैदानात २०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, त्यामुळे ते हा सामना जिंकतील, अशी चाहत्यांना आशा होती.
अजूनही राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघालाही मुंबई इंडियन्सना मागे टाकत पुढे जायची संधी आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)