ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
२,००० च्या नोटबदली बाबत आरबीआय व एसबीआयचा एक तांत्रिक दिलासा…!

२,००० च्या नोटबदली बाबत आरबीआय व एसबीआयचा एक तांत्रिक दिलासा…!

प्रकाशन: 21 May 2023 04:07 PM
वाचन संख्या 377

मुंबई | ब्यूरो न्यूज : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने काल शनिवारी आपल्या सर्व शाखांना सूचित केले की २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म आणि कोणत्याही ओळखीचा पुरावा आवश्यक नाही.

सन २०१६ च्या नोटबंदीनंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी तातडीने दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या होत्या.
मात्र कालांतराने चलनात इतर नोटा पुरेशा संख्येने आल्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे.
चलनात इतर नोटा (दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत) पुरेशा संख्येने आल्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई देखील २०१८ नंतर थांबवली होती. यातील बऱ्याचश्या नोटा २०१७ पूर्वी छापल्याने त्यांचे आयुष्यही संपत आले होते. या नोटा चलनात देखील फार मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात नव्हत्या, असेही ध्यानात आले होते. त्यामुळे क्लीन नोट पॉलिसीनुसार या नोटा रद्द करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटा मिळाव्यात ही रिझर्व बँकेची क्लीन नोट पॉलिसी आहे.

ज्यांचे बँक खाते नाही २००० रुपयांच्या नोटा कशा बदलणार याचे स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यानुसार आरबीआयच्या या नव्या निर्णयानुसार ज्यांचे बँक खाते नाही ते नागरीक २००० आरबीआयने निर्णयात स्पष्टपणे लिहिले आहे की ज्यांचे बँक खाते नाही ते देखील बँकेत जाऊन २०,००० रुपयांपर्यंतच्या २००० च्या नोटा एकावेळी बदलू शकतात.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स