ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पुन्हा धावले  युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक  ; कन्हैय्या पारकर व योगेश मुंज यांचीही समर्थ साथ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पुन्हा धावले युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक ; कन्हैय्या पारकर व योगेश मुंज यांचीही समर्थ साथ.

प्रकाशन: 16 May 2023 06:42 PM
वाचन संख्या 91

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांनी कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेत शहरातील समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये श्रीधर नाईक उद्यानामध्ये लाईट व्यवस्था करणे, जेसीबीच्या सहाय्याने नाथ पै नगर गणपती साना जाणारा रोड तयार करणे, तसेच नूतन बॅटमिंटन हॉल येथे लाईट व्यवस्था करणे या मागण्या करण्यात आल्या असून मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांनी दिला आहे.

या निवेदनात नमूद केले आहे कि कणकवली शहरामध्ये एकमेव श्रीधर नाईक उद्यान आहे. त्या उद्यानाचे काम ह्या वर्षी पूर्ण झाले असून, सर्व सामान्यासाठी खुले करण्यात आलेले आहे. दिवसभर उद्याना मध्ये गर्दी असते तसेच सायंकाळी सुद्धा लोंकाची गर्दी असते, परंतु उद्यानामध्ये कुठल्याही प्रकारची लाईट व्यवस्था नसल्यामुळे येणाऱ्या जनतेला नाहक त्रास होत आहे. तरी श्रीधर नाईक उद्यान मध्ये लाईट व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी.उद्यानाच्या बाजूला कणकवली नगरपंच्यायतच्या स्वागताचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. सदर बोर्ड मधून वीज पुरवठा उद्यानाला देण्यात यावा जनतेची होणारी गैरसोय पाहता येत्या आठ दिवसात लाईट व्यवस्था करण्यात यावी.त्याचबरोबर जेसीबीच्या साहाय्याने नाथ पै नगर गणपती साना जाणारा रोड तयार करण्यात यावा. नूतन बॅटमिंटन हॉल येथे लाईट व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या ८ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स