अचिर्णेत घडला अनोखा स्नेहमेळा…! ( विशेष)
सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या अचिर्णे गावात परवा १४ मे दिवशी तब्बल ३० वर्षानंतर यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुुदुर्ग येथील सन १९९२-१९९३ सालच्या माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षकांचा स्नेह मेळावा वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला १९९२-१९९३ सालचे सर्व माजी शिक्षकवृंद आणि जवळपास ३० माजी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.*
कार्यक्रमाला सुरवातीला सर्व शिक्षकवृंद यांचे पादुका पूजन रेश्मा रावराणे व अनंत मांजलकर यांनी केले, फटाक्यांच्या आतषबाीमध्ये सर्व शिक्षकवृंद यांच्यावर गुलाब पाकळ्यांच्या वर्षाव करत कार्यक्रम स्थळी स्वागत केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पूजन केले. दिवंगत माजी शिक्षक वृंद जी. टी.पाटील सर, गोंधळी सर, जगदाळे सर व माजी विद्यार्थी अलका रावराणे , भिकाजी मोंडकर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हुरहुण्णरी श्री सतीश कडू यांनी केले. कार्यक्रमात सर्व आजी – माजी शिक्षवृंद यांचा सत्कार करून गुरुदक्षिणा रुपात सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. शिक्षकवृंद यांना भेटवस्तू देऊन एक आठवण दिली. विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना रेश्मा रावराणे , महेश जगदाळे, विजयसिंह रावराणे, मंगेश कांबळे, प्रतिभा पोकळे, मंदा शिंगाडे, अनंत मांजलकर, रुपेश रावराणे, राजू सुतार,संदीप मेस्त्री, प्रवीण बांबरकर,सरिता पवार, विकास रावराणे, अनिल डोंगरे, प्रसाद महाडिक, अनंत पवार, सत्यवान नराम, प्रेमा मेस्त्री, नंदा कडू , मनिषा तेली , चंद्रकांत कदम , राजाराम शिंगाडे यांनी व्यक्त केले. देवदास कडू, संतोष सुतार , उदय रावराणे, सुचिता विचारे यांनी देखील सहकार्य केले.
कार्यक्रमात स्नेहभोजन झाल्यावर शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली, त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. डी.पाटील सर, पाटील मॅडम, कुळकर्णी सर, माळी सर, करडे सर, कुर्णे सर, वाघमारे सर, जाधव सर , तसेच आताचे शाळेचे मुख्याध्यापक कारेकर सर व तुळसकर सर यांनी मार्गदर्शन पर संबोधित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी फोटो सेशन आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन आणि पुन्हा पुढच्या वर्षी असेच एकत्र भेटण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम संपल्यावर चहा, नाश्ता करून सुसंवाद करत कार्यक्रमाची सांगता केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)