ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
दुग्ध विकासासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व संचालक गोकुळ संस्थेच्या  भेटीला....

दुग्ध विकासासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व संचालक गोकुळ संस्थेच्या भेटीला....

प्रकाशन: 03 Oct 2021 11:27 AM
वाचन संख्या 141

शेतकऱ्यांच्या हितासाठी गोकुळ मदत करणार ;गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचे आश्वासन…

जिल्ह्यातील होतकरु शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्याची आशा..

कणकवली | उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादन संघ एम के गावडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ गोकुळ संस्थेस भेट दिली. यावेळी गोकुळ संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील व एम डी- डि वि घाणेकर यांनी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी संचालक मंडळ यांच्या समोर मांडल्या. यावेळी दूध संघाचे चेअरमन एम के गावडे यांनी देखील जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन वाढण्यासाठी गोकुळने आम्हाला वेळोवेळी मदत करावी. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून http://localhost/news/public/uploads/20 हजार लिटर दूध मिळू शकेल. याचा फायदा आपल्या गोकुळ संस्थेस होईल. त्यामुळे आम्हाला दूध उत्पादनासाठी म्हशी उपलब्ध व्हाव्यात. तसेच चारा मुबलक मिळावा व दूध संकलनासाठी ही उपाययोजना व्हावी. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी गोकुळ जिल्हा सहकारी दूध संघच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आमचा नेहमी सहकार्य राहील कुठलीही अडचण आल्यास आम्ही नेहमी आपल्याला सहकार्य करू. कारण अडचणीच्या काळात गोकुळ संस्थेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार्य केले आहे. त्यामुळे आपण सुचवलेल्या पर्यायाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आपल्याला वेळोवेळी सहकार्य करू, असे आश्वासन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिले. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील व शेतकरी टिपु सावंत (आंब्रड), आप्पा देसाई (दोडामार्ग), पिंटू सावंत (फोंडाघाट), सुरेश हरम (किंजवडे), नारायण गावडे (बांदा), ज्ञानेश्वर परब (मडूरा ) आदी शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स