ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मुंबई-काळाचौकी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

मुंबई-काळाचौकी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

प्रकाशन: 03 Oct 2021 11:17 AM
वाचन संख्या 135

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती आयोजित उपक्रम

संतोष साळसकर |शिरगांव : मुंबई येथील बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्या वतीने काळाचौकी येथील अहिल्या विद्यामंदिर सभागृह,अभ्युदयनगर येथे आज ३ऑक्टो.रोजी सायं.५ते८ या वेळेत मुलांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या समितीतर्फे दरवर्षी खाजगी शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक योजनेद्वारे संपूर्ण फिसह शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते.

यावेळी मुंबई महानगर पालिकेचे स्थापत्य समिती(शहर) चे अध्यक्ष दत्ता पोंगडे, उपाध्यक्ष व नगरसेवक सचिन पडवळ,नगरसेवक अनिल कोकीळ,रमाकांत रहाटे, रेल कामगार सेवा चे सहकार्याध्यक्ष डॉ. जनार्दन देशपांडे,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे व्यवस्थापक विलास डांगे,उद्योजक अविनाशदादा जगताप,मुश्ताक नाख़वा,समाजसेवक नितीन कोलगे,टिंगटॉंग ऑनलाइन,सीएमडी उदय पवार,शाखाप्रमुख जयसिंग भोसले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पालकवर्गानी उपस्थित रहावे असे आवाहन बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार राजेंद्र साळसकर,उपाध्यक्ष संदेश पुरळकर,सरचिटणीस दीपक घाडीगांवकर,खजिनदार सौ.दीपा राणे,सहचिटणीस संगीता सावंत,सहखजिनदार सौ. स्वाती जाधव,हिशोब तपासनिस सौ.सुवर्णा माळी, सदस्य विलास इंगवले,रवींद्र कदम,उदयराज धुरी,ज्योती लोकरे,सौ.शमिका कुडतरकर यांनी केले आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स