ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
विराटच्या चमकदार प्रयत्नानंतरही कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध बेंगळुरु राॅयल चॅलेंजर्सचा पराभव ; आय पी एल सामना क्र.३६
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विराटच्या चमकदार प्रयत्नानंतरही कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध बेंगळुरु राॅयल चॅलेंजर्सचा पराभव ; आय पी एल सामना क्र.३६

प्रकाशन: 27 Apr 2023 06:29 AM
वाचन संख्या 398

क्रीडा | सुयोग पंडित : काल २६ एप्रिलला आयपीएल २०२३ चा ३६ वा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात थोडा अटीतटीचा सामना झाला.

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करून २० षटकात ५ विकेट्स गमावत २०० धावांपर्यंत मजल मारली होती. जेसन राॅय ने ५९ तर कर्णधार नितीश राणाने आक्रमक अशा ४८ धावा केवळ २१ चेंडूत ठोकल्या.

या धावांचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीची कोलकाताच्या गोलंदाजांनी आर.सी.बी.च्या घरच्याच मैदानावर त्यांना चितपट केले.

सलामीच्या कर्णधार फाप डु प्लेसिसनंतर शाहबाझ अहमद, ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात माघारी परतले आणि आरसीबीची धावसंख्या मंदावली. त्यानंतर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी करून आरसीबीच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर व्येंकटेश अय्यरने विराटचा अप्रतिम झेल पकडला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. त्यामुळे आरसीबीने २० षटकात ८ विकेट्स गमावत १७९ धावा केल्या आणि आरसीबीचा या सामन्यात पराभव झाला.
आरसीबीचे सलामीचे फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने चौफेर फटकेबाजी करत सुरुवातीच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. परंतु, सुयश शर्माच्या गोलंदाजीवर डु प्लेसिस १७ धावांवर असताना झेलबाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. त्यानंतर विराट कोहलीने कोलकाताच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी खेळी केली. विराटने ३३ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीनं ५१ धावांची खेळी केली. शाहबाज अहमद आणि ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात माघारी परतल्याने आरसीबी दबावाच्या छायेत आली.

माहिपाल लोमरोरने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी साकारली. परंतु, चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर माहिपाल झेलबाद झाला आणि आरसीबीच्या विजयाची आशा मावळली. दिनेश कार्तिकही चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर २२ धावांवर बाद झाला. कोलकातासाठी सुयश शर्मा आणि आंद्रे रसलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर चक्रवर्तीने चार षटकांत २७ धावा देत ३ विकेट घेण्याची प्रभावी कामगिरी केली आणि तोच सामनावीर देखील ठरला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स